गर्मी चे प्रमाण आधीक प्रमाणात, म्हणून खालील प्रमाणे जिल्ह्यात पाऊस.
THFS WHEATHER technology JALNA LIVE 14 August Havaman update..
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मागील एक दिवसापासून गर्मीचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढले आहे जिल्ह्यानुसार याची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे तर पाहूया स्थानिक वातावरणामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस असेल.
मराठवाड्यातील भागात..
नांदेड , लातूर परभणी पालम तसेच भोकर या परिसरामध्ये पावसाचे चान्सेस दिनांक 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट या दरम्यान आहेत..
जालना बीड हिंगोली धाराशिव या भागामध्ये मोजक्या ठिकाणी गर्मीची लेवल वाढल्यामुळे ढगांची निर्मिती होईल आणि स्थानिक वातावरण तयार होऊन चार पाच ,चार पाच गावांना हा पाऊस होऊ शकतो.. सर्व दूर पाऊस आता नाही..
विदर्भातली कंडिशन..
विदर्भामध्ये पूर्व भागामध्ये म्हणजे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर अकोला दिनांक 14 ऑगस्टला ढगाळ वातावरण निर्माण होईल.
15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काही मोजक्या भागांना. मेघगजिनेसह पावसाची शक्यता आहे.
बांधवांनो हा अखंड चालणारा पाऊस यामध्ये खंड पडलेला आहे त्यामुळे सर्व दूर पाऊस याही जिल्ह्यांना आता नाही दहा पाच जिल्हे मध्ये पाऊस जास्त झाल्यास तो पाऊसही सर्व दूर होत नसतो या पावसामध्ये जोरदार सरी तर काही ठिकाणी याच पावसाची उरलेली वितळण बाकीच्या गावांना पडू शकते..
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 18 ऑगस्टला वातावरण सक्रिय होईल त्याही अगोदर 17 ला सुद्धा वातावरण निर्मिती होण्याची चान्सेस आहेत या काळात स्थानिक वातावरण तयार होऊन दहा बारा दहा बारा गावांना प्रत्येक तालुक्यामध्ये पावसाचे चान्सेस आहेत जोर मात्र गरमीच्या लेवलमुळे बरा राहील गाव मात्र कमी राहतील…
खानदेश विभाग
खानदेशातील परिस्थिती सिनखेड असेल व उर्वरित भागामध्ये चांगला पाऊस झालाय म्हणून यांना विश्रांती हवी विश्रांती यांना आहेच पण यामध्ये काही मोजक्या भागांना स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील.
सर्व दूर पाऊस ढगाळलेल्या वातावरण या भागांना आता नाही पण दहा पाच दहा पाच गावांना स्थानिक वातावरणामुळे पाऊस राहू शकतो..
18 19 ऑगस्ट दरम्यान जळगावच्या उत्तर भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्व दूर नाही..
पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र..
कोल्हापूर सोलापूर साताऱ्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगला पाऊस झालाय.
पण काही भागांना अजूनही म्हणावा असा पाऊस नाही तरीही शेतकऱ्यांना पावसाची गरज खूप भासते आहे..
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पावसाचा आगमन होणार आहे..
18 ते 22 ऑगस्ट दरम्यान भाग बदलत पण मोजक्याच ठिकाणी पाऊस सक्रीय होईल.. पाऊस एक-दोन एक दोन ठिकाणी प्रत्येक तालुक्यात होण्याची चान्सेस आहेत सर्वजण पाऊस येणार नाही 22 तारखेपर्यंत नाही.
प्रिय शेतकरी बांधवांना मागील जुलै महिन्यामध्ये 25 जुलैला जो खंडाचा रिपोर्ट दिलाय त्यानुसार 12 ऑगस्ट पासून खंडाची तीव्रता विदर्भ मराठवाडा मध्ये जाणते आहे.
उष्णतेची लेवल पाहता अक्षरशा खंडाची तीव्रता ही जाणू लागली आहे ज्या भागांना समाधानकारक पाणी पडलाय किंवा ज्यांना मोजकाच पडलाय यांना या आठवड्यातच पाण्याची गरज जास्तच भासणार आहे..
ज्यांना चांगला पाणी पडला पण ऊनही तसेच पडले त्यांनाही आठवड्यामध्ये पाण्याची गरज भासणार.
कारण हा खंड आहे या खंडातून सुटका केव्हा होणार यासाठी तोडकर हवामान अंदाज youtube चैनल वरती लाईव्ह पाहावा..
व तसेच ज्या शेतकऱ्यांना खूप पाणी झालाय पाण्याचा कंटाळा आलाय त्यांच्याही भागांमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये चार ते पाच दिवस विश्रांती मिळत जाईल हे वातावरण तुम्हालाही पोषक आहे काळजी नसावी.
अधिक माहितीसाठी नेहमी अपडेट पाहण्यासाठी तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम ला दररोज भेट देत जा. धन्यवाद..