हवामान अंदाज, हवामान अपडेट आजचे हवामान अंदाज
THFS wheather Technology 7 July update..
खंड (बखाड) यंदा ही ऑगस्ट ते सप्टेंबर कालावधीत होणार का.?..
मागील वर्षी तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळेच्या रिसर्च रिपोर्ट नुसार तो आपण पाहिले..
२०२३ मध्ये सांगितलेल्या प्रमाणे खंड खुप भयंकर होता… सोयाबीन कापूस उत्पादकांना चांगला फटका बसला..
त्यामुळे यंदा ही ऑगस्ट ते सप्टेंबर कालावधीत खंड होणार का. हा रिपोर्ट पाहण्यासाठी आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहे..
समस्त शेतकरी बांधवांनो भगिनींनो मान्सून जुलै महिन्यात सर्वात जास्त प्रमाणात बरसणार आहे.. त्यामुळे अरबी समुद्रात हाय प्रेशर निर्माण होण्याची शक्यता ऑगस्ट महिन्यात जास्त प्रमाणात राहील..
हाय प्रेशर मुळे वारे जोराने वाहतील.. या वार्या मुळे ढगाळ वातावरण राहील पण ढगांची गर्दीत साठी अडथळे.व पाऊस कमी..१२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर कालावधीत खंडाचा परीणाम पाहयला यंदा ही मिळणार आहे..
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, यंदा ला नीना कंडीशन असल्याने काही ठिकाणी खंड कमी राहील…जूलै महिन्यात चांगला असल्याने खंडाचा परीणाम काही ठिकाणी होण्याची शक्यता कमी आहे..
या मध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे..पण ति जिल्हे विदर्भ मराठवाड्यात मोडतात..
यंदा चा खंड काही ठिकाणी पोषक तर काही ठिकाणी घातक राहील..
पिके करपणे,फुल गळ पाते गळ असे प्रकार घडतात.या मुळे उत्पादन कमी होऊन नुकसान होते.. मित्रांनो जुलै महिन्यात सर्वात जास्त प्रमाणात पावसाचा जोर असल्याने विहीर तलाव काही भागात भरतील त्यामुळे चिंता मागिल वर्षी पेक्षा कमी राहील..
- शेतकरी बांधवांनो जिल्हा नुसार सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल…काळजी नसावी.. धन्यवाद