आज दक्षिण महाराष्ट्रात सर्वाधिक व 9 जुलै दुपारी या जिल्ह्यात जोर वाढेल, सर्व भागात वातावरण मध्यरात्री सक्रिय होईल….
9 जुलै संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत खालील प्रमाणे वातावरण निर्माण होईल…..
हवामान अंदाज जिल्ह्या विभागानुसार..
१.मराठवाड्यात पावसाचा अंदाज.
संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली
वरील जिल्ह्यात वातावरण सक्रिय आहे..पण परिस्थिती वरील भागात दिशा नुसार दिवसा दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन आणि गर्मी राहिल…9जुलै संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत वातावरण चांगलेच बिघडणार आहे..या मध्ये लातूर बीड धाराशिव सर्व तालुक्यात जोरदार आगमन होईल काही ठिकाणी चांगला पावसाची शक्यता.. रात्री 7.वाजता पासून ते मध्यरात्री एक पर्यंत पाऊस राहील…10 जुलै सकाळी काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होईल…
२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा
वरील जिल्ह्यात 8 जुलै चांगला पाऊस झाला..व सोडलेल्या भागात आज 9 जुलै संध्याकाळी व काही ठिकाणी मध्यरात्री सक्रिय होईल.. पावसाचा जोर नेहमी प्रमाणे राहील.
बर्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..
पुढील तीन दिवस जोर कायम..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
मागील काही दिवसांपासून दडी मारल्यापासुन आज 8 जुलै संध्याकाळी चांगला दिलासादायक वातावरण व पाऊस झाला आहे…या भागात काही ठिकाणी पाऊस राहील.. पुढील दोन दिवस सर्व ठिकाणी आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील..
आभाळ भरून दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. पाऊस बर्याच ठिकाणी चांगला राहील.. वातावरण पुढील आठवडाभर पावसाचे राहील…
४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा
8 जुलै काही भागात कोल्हापुरात बर्याच ठिकाणी पाऊस झाला..आज 9 जुलै पुन्हा सर्वाव जास्त वातावरण चांगले वरील सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय होईल..
सांगली सोलापूर सातारा सर्वाधिक वातावरण बिघडणार आहे…
वरील सर्व ठिकाणी पाऊस राहील.. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्री पर्यंत पाऊस राहील..वदिशा बदलून पाऊस पडेल.पण दिनांक 11 जुलै पर्यंत सर्व ठिकाणी कमी आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील.
५.खानदेशात पावसाचा अंदाज..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव
वरील जिल्ह्यात काही ठिकाणी मागिल आठवड्यापासून चांगला पाऊस आहे.. मात्र सोडत असलेल्या भागात पाऊस नसला तरीही तो भाग या दोन दिवसांत कव्हर करेल..आज दिं.9 जुलै जळगावात उत्तर भागात जोर वाढेल.. धुळे मालेगाव साईट चांगली राहील…
या जिल्ह्यामध्ये सर्व पुन्हा झाडी सारखं 12 जुलै पुन्हा झडी सारखाच पाच दिवस पाऊस होणार आहे…
६. कोकण किनारपट्टी..
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…
नेहमी प्रमाणे पण जोर वाढेल..
आभाळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण.. मध्यम ते जोरदार पाऊस सर्वत्र राहील.. पुढील पाच दिवस चांगला पाऊस राहील….
पुढील अपडेट…. राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं. 16-17 पासून पाऊस सक्रिय होईल…
याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..
किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…
तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव