पाऊस, सुर्यदर्शन, खंड,परतीचा प्रवास आणि धुई धुकं हवामान अंदाज..
नमस्कार शेतकरी मित्रांनो..
ज्या भागांना 29 जुलैला ऊन पडले नाही किंवा सुदर्शन झाले नाही अशा भागांना आज दिनांक ३० पासून होईल ही तोडकर हवामान अंदाज ची गॅरंटी आहे..
विश्वास ठेवा सुर्य दर्शन आणि शेतीकामाला उघाड दाखवून देईल..
🔸💯मात्र तोडकर हवामान अंदाज सेवेला हा शेवटचा मेसेज येऊन पूर्णविराम देतोय..
शेतकरी बांधवांनो तुम्हाला खंडाचा हे मेसेज दिला आहे..
या ऑगस्ट महिन्यांमध्ये धूई धुकं पडेल..
पातेगळ किंवा विविध प्रकारच्या पिकांना परीणाम ६-७ ऑगस्ट पासून जाणवेल..
त्यामुळे दिलेल्या तारखेला नियोजन तयारीत रहावे..
दिनांक २-३ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे.. मात्र झडी सारखा राहील.. आणि दोन दिवस राहिल.. पश्चिम महाराष्ट्रात कमी तर पुर्व विदर्भ मराठवाडा बरा राहील..
पश्चिम महाराष्ट्र.व कोकण किनारपट्टी वरील जोर ३० जुलै रोजी ओसरणार आहे..
या दोन दिवसांत काही मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरण व दिवस मावळतीला ढग दाटून आल्यावर काही ठिकाणी एखादा सटकारा किंवा पाऊस होईल..
पण आता सर्वदुर असं पावसाचे वातावरण हे दोन तीन दिवस नाही..
परतीचा प्रवास.. सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पासून सुरू होणार आहे..
नदी नाले ओढे वाहतील..
धरणं भरतील.. काही ठिकाणी शेतमालाला हानी पोहोचू शकते..
असेच वातावरण अती पावसामुळे सप्टेंबर कालावधीत होणार आहे..
हवामान अंदाज आता विभागानुसार पाहु..
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये..
आज पासून उघाड पुढील तीन दिवस राहिल..
२ ऑगस्ट रोजी पुन्हा वातावरण निर्माण होईल…
३०-३१ ऑगस्ट रोजी दिवस मावळतीला स्थानिक वातावरण निर्माण होईल.. मोजक्या ठिकाणी पाऊस राहील…. सर्व ठिकाणी नाही..
विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये..
२ ऑगस्ट रोजी पुन्हा वातावरण निर्माण होईल… सर्व ठिकाणी कमी आधीक प्रमाणात सक्रिय होईल..
३०-३१ ऑगस्ट रोजी दिवस गर्मी ची लेवल वाढणार आहे त्यामुळे.दिवस मावळतीला स्थानिक वातावरण निर्माण होईल.. मोजक्या ठिकाणी पाऊस राहील…. सर्व ठिकाणी नाही..
पश्चिम महाराष्ट्र, खानदेश
सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण दोन दिवस विश्रांतीचे राहील सुर्य दर्शन आणि शेतीकामाला उघाड मिळेल..
२-३ दरम्यान ढगाळ वातावरण राहील.. काही ठिकाणी पाऊस राहील सर्व ठिकाणी नाही…
४-५ ऑगस्ट रोजी स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत काही ठिकाणी राहील..
आपल्या भागात आता पाऊस थांबला आहे..
आपलाच .. तोडकर हवामान अंदाज..
Havaman andaj sangayach band karu naka