10 जुलै मध्यरात्री जोरदार

राज्यात 10 जुलै रोजी मध्यरात्री पर्यंत पाऊस असा राहील 

THFS wheather Technology jalna update 10 July…

उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस असा राहील..

 

बुलढाणा जिल्ह्यातील.मेहकर शेवगाव खामगाव काही ठिकाणी, चिखली देऊळगाव राजा मार्ग घेत खानदेश भागात पाऊस सक्रिय होईल..
जळगाव धुळे नंदुरबार विशेष उत्तर भागात वातावरण सक्रिय राहील…

 

विदर्भात काही व मराठवाड्यात नांदेड, हिंगोली परभणी पुर्वेकडे तेलंगणा मार्गे पुर्व भागातुन पश्चिम भागात सरकत पाऊस मध्य रात्री पर्यंत सक्रिय होईल..
पावसाची तीव्रता ही नेहमी प्रमाणे असणार आहे म्हणजे काही भागांना मुसळधार तर काही भागांना मध्यम तर काही भागांना शितोडे पडतील अशी कंडिशन आहे..

जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात म्हणजे पुर्व भागात पाऊस राहील…

परभणी बीड जिल्ह्यात पूर्व दिशेला तसेच उर्वरित भागांमध्ये नेहमीप्रमाणे ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल..

राज्यात 11 जुलै रोजी पावसाचा अंदाज...

उद्या 11 जुलै रोजी सर्वाधिक गर्मीची लेवल वाढणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन हा पाऊस दुपारनंतर सक्रिय होईल.

पावसाचा केंद्रबिंदू विदर्भ आणि मराठवाडा असेल व तसेच खानदेश ही त्यामध्ये चांगला असणार आहे.. खानदेशामधील जळगाव नंदुरबार धुळे शहादा मालेगाव पर्यंत पावसाची मजल चांगले आहे ..पण भाग बदलत असणार आहे.

विदर्भामध्ये बुलढाणा चिखली खामगाव मेहकर अकोला अमरावती वाशिम पर्यंत सांगली मजल आहे व पूर्व विदर्भातही चांगला पाऊस होणार आहे..

मराठवाड्यामध्ये जालना बीड परभणी लातूर पर्यंत चांगला पावसाची शक्यता आहे. मात्र पाऊस भाग बदलत आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वैजापूर छत्रपती संभाजी नगर नाशिक पैठण कन्नड सिल्लोड भाग बऱ्यापैकी घेण्याची शक्यता आहे..
राज्यात पुन्हा 48 तासांत म्हणजे दिं.12 जुलै पासून झडीचं वातावरण सुरू होणार आहे. जिल्ह्यामध्ये सर्वदूर वातावरण सक्रिय आणि ढगाळ तर बर्याच ठिकाणी रिमझिम पाऊस होणार आहे…

सविस्तर माहिती 10 जुलै च्या रात्री साडेसात वाजता देण्यात येईल ..

तोडकर हवामान अंदाज लाईव्ह युट्युब वर पाहू शकता..धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top