सतत सोडत असलेल्या भागातील दुबार पेरणीचे संकट टळणार…
मान्सून साठी पोषक वातावरण, सक्रिय परिस्थिती..
राज्यभरात मान्सून हा आतापर्यंत भाग बदलत पडलेला आहे. यामुळे काही भागांना चांगला पाऊस तर काही भागांना सतत सोडल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे .यामध्ये अकोला जालना अहमदनगर नाशिक तर ,बीडमध्ये ही काही ठिकाणी, ही कंडीशन पाहायला मिळते.शेतकरी बांधवांनो कमजोर मान्सून मुळे ही कंडीशन आपणास पाहायला मिळाले आहे. आणि त्याची परिणाम आपल्याला भोगायला सुद्धा मिळतात..
पण आता हा ही परिस्थिती बदलणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र, आणि खानदेशामध्येही त्याबरोबरच विदर्भ सुद्धा चांगल्या पद्धतीने घेणार आहे.तो दिवस उद्यापासून बदलतो आहे. म्हणजेच दिनांक 4 जुलै ही तारीख मान्सून पावसाच्या पोषक वातावरणासाठी सज्ज होत आहे. आजही तीन जुलै,खालील प्रमाणे सांगितलेल्या भागांमध्ये भाग बदलत का होईना, पण जरा दिशा बदलून पडणार आहे..
नाशिक मालेगाव जळगाव वैजापूर शिर्डी राहता पाथर्डी गंगापूर पैठण सोलापूर, सांगली आणि कोकण किनारपट्टीमध्ये,बऱ्याच ठिकाणी संततधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे..
आजची कंडीशन दक्षिण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस राहील..
पण दुपारनंतर अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा तसेच नांदेड यवतमाळ हिंगोली, वाशिम या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोडलेले भाग सुद्धा घेणार आहे. पण यातही काही ठिकाणी सोडले तर काळजी नसावी,माहिती सविस्तर वाचा..
उद्या दिनांक 4 जुलै राज्यात सकाळ पासून सर्व दूर पावसाचे वातावरण होणार आहे. मित्रांनो हे वातावरण होणार आहे पण पाऊस बऱ्याच ठिकाणी म्हणजे 80 टक्के भागांमध्ये सक्रिय होणार आहे. यामध्ये जालन्याचा उत्तरेकडील भाग जळगाव बऱ्याच ठिकाणी बुलढाणा बऱ्याच ठिकाणी नांदेड परभणी लातूर बीड नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार शहादा हिंगोली, वाशिम सुद्धा यामध्ये आहे. नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा मध्यरात्री संध्याकाळपर्यंत, हा पाऊस सक्रिय होणार आहे..
व ज्यांना सतत नेहमी पाऊस पडतो वापसा नाही, अशा शेतकरी मित्रांना विनंती आहे.आज पासून पुढील तीन दिवसांमध्ये जर तुमचा भाग सोडला असेल. वापसा होत असेल तर दिनांक चार किंवा सहा जुलै च्या आत खते,पेरण्या उरकून घ्याव्या अन्यथा पुन्हा एकदा दिनांक आठ जुलैपासून ते 11 जुलैपर्यंत सतत, पावसाचा जोर वाढणार आहे.आणि हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्र मध्ये असणार आहे.
महाराष्ट्रामध्ये तसेच इतरही राज्यांमध्ये तेलंगणा असेल मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल केरळ असेल कर्नाटक असेल. या सर्व राज्यांमध्ये त्या काळामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चांगला मुसळधार पाऊस बरसणार आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर बनत आहे याचा फायदा भारतातील दक्षिण भारत मध्य भारत या राज्यामध्ये बरसणार आहे.त्यामुळे शेतातील पेरणीच्या अडचणी व इतर खते औषधे देण्यासाठी आलेले अडथळे हे आता राज्यांमधून दूर होणार. आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनी पावसात संदर्भात धरलेली धास्ती ही आता कमी होणार आहे मित्रांनो पाऊस अंदाज चांगला आहे. गेल्या वर्षी आपण पावसाची टक्केवारी ही 42 टक्के दिली होती त्या पद्धतीने तो बरसलाय. यंदा 84 टक्के हात तोडकर हवानंदाचा अंदाज होता, आणि तो यशस्वी देखील ठरणार आहे. त्यामुळे काळजी नसावी..मुळे पुन्हा पेरणी लावणी खतलांबणी होणार आहे.. कमजोर मान्सूनचे सत्र आता चांगल्या मान्सून मध्ये बदलणार आहे त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या मनातली भीती चिंता कमी होणार आह
यंदा महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रातील विभागांमध्ये खंड राहील का व तो किती काळासाठी जाईल आपला प्रश्न आणि उत्तर..
मित्रांनो खंडा बाबत आपण खूप घाबरतात कारण की त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत.यंदाही ऑगस्ट दोन आठवडे सरल्यानंतर तसेच सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत बखाडीची शक्यता ही व्यक्त करण्यात येते आहे. पण याबाबत आपला रिसर्च चालू आहे. तो कोणत्या विभागांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जोड दाखवणार आहे. पावसा संदर्भात आपण गेल्या वर्षी सुद्धा खंडाची पूर्वकल्पना शेतकरी मित्रांना दिली होती त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये तोडकर हवामान अंदाज च खंड कसा असणार आहे.
याबाबत प्रश्न निर्माण आहेत, काळजी नसावी दिनांक सात जुलैला प्राईम मेमंरशिप मित्रांना या खंडाबाबत माहिती सर्वात अगोदर मिळणार आहे. 14 किंवा 15 ऑगस्ट रोजी आपण सर्व शेतकरी मित्रांना खंडाची बातमी याच वेबसाईट वरती देणार आहोत. मित्रांनो, खंडाची चिंता करू नका. यंदा ला निनो वर्चस्व आहे.. त्यामुळे यंदाचा खंड मोठा जरी असला पण कमजोर राहील. यामध्येही चांगल्या पाऊस भरणची शक्यता आहे.
असा अंदाज तोडकर हवामान अंदाज, फोरकास्ट सिस्टीम मध्ये म्हणजे आहे. अंदाज अचूक आणि नियमित वेळेमध्ये अपडेट असतात. तोडकर हवामान अंदाज माहिती व सविस्तर लेख वाचण्यासाठी youtube चॅनल, आणि तोडकर हवामान अंदाज वेबसाईट नेहमी अपडेट पाहत जा. धन्यवाद