लवकरच खंड सुरू होणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता लवकरच उघडीप मिळणार आहे..

 

मात्र जाता जाता 8-9 ऑगस्ट पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी खानदेशामध्येही मोजक्या ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रात ठीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र सटकरे किंवा भाग बदलत..

मित्रांनो दहा तारखेपासून एक चांगलं सुर्यदर्शन मिळणार आहे..

मात्र हे सूर्यदर्शन खंडाची चाहूल देणार असेल..

च्या भागांमध्ये पाऊस अपुरा पडला त्या भागांना खंड त्रासदायक राहील.

मात्र ज्या ठिकाणी पाऊस चांगला झालाय त्या भागांना हा खंड पोषक राहील..

पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या खंडाच्या रडावरती जास्त आहे पण काळजी नसावी..

मित्रांनो दिनांक 19 ऑगस्ट 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये भाग बदलत जोरदार पावसाला देखील सुरुवात होईल मात्र याची व्याप्ती कमी आहे जसे की शंभर टक्के पैकी 60% भाग तो घेणार आहे..

25 जुलैला दिलेला खंडाच्या रिपोर्टनुसार ही माहिती प्रसारित करण्यात येत आहे..

त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अखंड सात सप्टेंबर तारखेपर्यंत राहू शकतो..

त्यानंतर प्रतिचा जोरदार प्रवास दिनांक आठ ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये सुरुवात करेल..

तोडकर हवामान अंदाज लाईव्ह मार्फत याची पूर्वकल्पना आपण 25 जुलैला दिली होती तसेच चार जुलैपासून हे भाकीत देखील करण्यात आलं होतं..

2023 या वर्षी अलनिनो चा खंड होता.

त्यामुळे त्याची तीव्रता ही जास्त होती.

जे आपण तोडकर हवामान अंदाज मार्फत माहिती गेल्या वर्षीही मिळवली होती..

मात्र यंदा 2024 ला लहानीनाचं वर्चस्व आहे.

त्यामुळे 70 ते 75 टक्के भागांना खंडाची जास्त काही तीव्रता जाणवणार नाही..

याउलट हा खंड पोषक असणार आहे..

खंडामध्येही समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंतेचं प्रमाण कमी असणार आहे..

मात्र प्रतीचा प्रवास कसा स्वरूप धारण करेल याची चिंता लागली आहे.

याच संदर्भात तोडकर हवामान अंदाज या चॅनल वरती लाईव्ह आठ ऑगस्ट संध्याकाळी आठ वाजता घेण्यात येईल.

आता ८ ऑगस्ट ते ९ऑगस्ट महिन्यात थोडक्यात हवामान अंदाज.

मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण विदर्भात ही सेम कंडीशन त्याचबरोबर हलक्या सरी तर काही ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे..

आणि नंतर हा पाऊस उघडून सुदर्शन चांगले पडणार आहे ती तारीख दहा ते अकरा ऑगस्ट आहे.

धन्यवाद शेतकरी मित्रांनो ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यांना पाठवावी आणि सतर्क करावे धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top