राज्यात मेघगर्जनेना कमी होऊन , पावसाला झडीच स्वरूप… मात्र यातही भाग सोडत दमदारच..
नमस्कार शेतकरी मित्रांनो,महाराष्ट्रात तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० टक्के भागांना मुसळधार ते समाधान कारक पाऊस झाला आहे..
पण या भागातील काही ठिकाणी आजुन चांगला पाऊसाची प्रतिक्षा संपली नाही..
राज्यात पुन्हा सर्व ठिकाणी मध्यम स्वरूपाचा झडी सारखेच वातावरण सक्रिय होईल.. सोडलेल्या भागांना दमदार हजेरी लावणार आहे..
सविस्तर माहिती विभागानुसार पाहु..
मराठवाड्यात…
जालना बीड संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर नांदेड, हिंगोली जिल्हा
दिनांक २२ ऑगस्ट भाग बदलत पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन राहील…
दिनांक २३-२४-२५ या सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी झडी सारखेच वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आधुन मधुन होत राहील..या मध्ये सतत सोडत असलेल्या भागातील पिकांना जिवदान मिळणार आहे..
विदर्भात….
बुलढाणा वाशीम अकोला अमरावती वर्धा गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यातील..
वातावरण भाग बदलत मोजक्या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..
पण दि.२२ ऑगस्ट रोजी असे वातावरण २५ टक्के वारी नुसार भाग घेईल..
दिनांक २३-२४-२५ या सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी झडी सारखेच वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आधुन मधुन होत राहील..या मध्ये सतत सोडत असलेल्या भागातील पिकांना जिवदान मिळणार आहे..
पश्चिम महाराष्ट्र..
सांगली सोलापूर सातारा पंढरपूर पुणे नाशिक मालेगाव अहमदनगर जिल्ह्यातील
भागातील सर्व ठिकाणी कमी आधीक प्रमाणात पाऊस चालू राहील..
दिनांक २२ भागात बदलत सर्व जिल्ह्यांमध्ये ३०-३५ टक्के वारी नुसार बरसणार..
दिनांक २३-२४-२५ या सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी झडी सारखेच वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आधुन मधुन होत राहील..या मध्ये सतत सोडत असलेल्या भागातील पिकांना जिवदान मिळणार आहे..
खानदेश विभाग.
नंदुरबार धुळे जळगाव शहादा परीसरात..पावसाचा जोर कायम राहील..काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी आजुन प्रतिक्षा संपली नाही..अशा भागात चांगला जोरदार पाऊस सक्रिय होईल..दिनांक.२२-२५ या दरम्यान या. भागात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार आहे..
थोडक्यात माहिती..
दिनांक २२ रोजी विदर्भात बर्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस आज आपला प्रभाव टाकणार आहे… मध्यम ते जोरदार हजेरी लावणार आहे..
उर्वरित भागात नेहमी प्रमाणे भाग बदलत पाऊस राहील..
पुढील दोन दिवस वातावरण भाग बदलत झडी सारखेच वातावरण निर्माण होईल…
पुढील काळात वातावरण कमी होऊन परतीचा प्रवास ही मान्सून लवकरच सुरू करतार आहे..
याच संदर्भात सविस्तर माहिती लाईव्ह तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह च्या माध्यमातून दिला जातो ..