राज्यात जोर ओसरला, पण पुन्हा जोरदार

THFS wheather update..5 August..

राज्यात पुन्हा सुर्यदर्शन 6ऑगस्ट, बर्याच ठिकाणी जोर ओसरेल 7 ऑगस्ट पर्यंत..

व तसेच दिं.6-7ऑगस्ट दरम्यान खालील प्रमाणे शक्यता राहील…

हवामान अंदाज जिल्ह्या विभागानुसार..
१.मराठवाड्यात पावसाचा अंदाज.
संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली.
वरील जिल्ह्यात वातावरण सक्रिय आहे..पण परिस्थिती वरील भागात भागात सुर्य दर्शन दिवसा दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन आणि वारे राहिल…8-9झडीचं वातावरण राहील पण आधुन मधुन तुरळक उन ही दिसेल..9ऑगस्ट संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत वातावरण बिघडणार आहे..या मध्ये लातूर बीड धाराशिव काही ठिकाणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार आगमन होईल मोजक्या ठिकाणी चांगला पावसाची शक्यता..
दिनांक..6-7ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत सटकारा राहील.. मात्र भाग बदलत काही ठिकाणी..
२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा

दिनांक .6- ऑगस्ट सकाळी पहाटे हलक्या सरी व काही ठिकाणी मध्यरात्री सक्रिय होईल.. पावसाचा जोर नेहमी पेक्षा उघडीप सारखा राहील.
8-9 ऑगस्ट मोजक्या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील..
फवारणीसाठी योग्य वातावरण 6-7 राहील…
दिनांक..6-7ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस दिवस मावळतीला भाग बदलत मध्यम राहील.. मात्र काही ठिकाणी थोडा बरा राहील..
..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
या भागात उघडीप वातावरण ढगाळ हलक्या सरी सारखाच आहे..
काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार..
दिनांक 6-7 उन ढगाळ वातावरण..
दिनांक..6-7ऑगस्ट स्थानिक वातावरण जरा मोकळे सुर्य दर्शन होईल .. …व या जिल्ह्यामध्ये चांगले सुर्यदर्शन 9-10 पासून होणार आहे
परतीचा प्रवास मुसळधार या भागात राहील…

४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा जुलै महिन्यात या भागात कोल्हापुरात बर्याच ठिकाणी पाऊस झाला..आज दिनांक 6सर्व ठिकाणी ढगाळ उन हलक्या सरी सारखं वातावरण राहील..
सांगली सोलापूर सातारा वातावरण दिं.6-7 दिवस मावळतीला बिघडणार आहे…
वरील भाग बदलत मोजक्या ठिकाणी पाऊस राहील.. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्री पर्यंत पाऊस राहील..वदिशा बदलून पाऊस पडेल.
या भागातील सर्व ठिकाणी वातावरण हळूहळू पुढील आठवड्यात मोकळे होउन खंड सुरू होणार आहे.

५.खानदेशात पावसाचा अंदाज..

धुळे नंदुरबार शहादा जळगाव

वरील जिल्ह्यात काही ठिकाणी मागिल आठवड्यापासून चांगला पाऊस आहे.. आज दिं.6-7 ऑगस्ट जळगावात उत्तर काही भागात सुर्य दर्शन व मोजक्या ठिकाणी पाऊस राहील..धुळे मालेगाव साईट चांगली मोकळे वातावरण राहील…
दिनांक..6-7 ऑगस्ट वातावरण कमी होईल…. मात्र मोजक्या ठिकाणी‌ स्थानिक वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी पाऊस..
व खंड या भागात 12 तारखेपासून सुरू होणार आहे.
६. कोकण किनारपट्टी..
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…

नेहमी प्रमाणे पण जोर जरा ओसरेल सुर्य प्रकाश वाढेल वाढेल..
आभाळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण.. मध्यम ते जोरदार पाऊस मात्र मोजक्या ठिकाणी राहील.. पुढील पाच दिवस चांगला पाऊस व ढगाळ राहील….

थोडक्यात मनोगत…

समस्त शेतकऱ्यना सप्रेम नमस्कार

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यांमध्ये खंड आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाची खंडाची तुलना 50 टक्के कमी आहे..

त्यामुळे मराठवाड्या विदर्भाला जास्त काही घाबरायचं काम नाहीये..

पण निलंगा परिसर लातूरचा दक्षिणेकडील भाग या भागांना पावसाने सोडले असे भाग ज्यामध्ये अहमदनगर नाशिक पैठण गंगापूर अहमदनगर मधील काही भाग येत आहेत.

माझं पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा खंडामध्ये सुद्धा 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान किंवा 22 तारखेपर्यंत या काळातही जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत..

त्याचबरोबर यंदा सर्व ठिकाणचे तळे बंधारे नदी नाल्या या परतीच्या प्रवासामध्ये चांगल्या भरणार आहेत वाहणार देखील आहेत 8 सप्टेंबर पासून ते १५ सप्टेंबर पर्यंत दरम्यान कोणत्याही एका तारखेला परतीचा प्रवास सुरू होणार आहे मुसळधार त्यातील मुसळधार हा प्रतीचा प्रवास असून 2019 किंवा 2022 ची आपणास आठवण येईल त्यामध्ये आपल्या शेतमालाचा नुकसान व तसेच तसेच नासाडी करून जाणारा पाऊस हा आपल्या आठवणीत येईल..

पुढील अपडेट.… राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं.19-20ऑगस्ट- पाऊस सक्रिय होईल… दोन दिवस भाग बदलत राहील..

याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..

किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…

तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top