राज्यात 15 ऑगस्टला वातावरण बिघडणार कुठे पाऊस तर कुठे नुसता ढगाळ वातावरण..
🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
खालील प्रमाणे विभागानुसार व जिल्हा नुसार माहिती पाहूया..
मराठवाडा विभागामध्ये..
15 ऑगस्टला ढगाळ वातावरण होईल तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळली.. तर काही मोजक्या भागांमध्ये सटकारे येतील..
दिवसभर अधून मधून चांगले ढगाळ वातावरण होत राहील..
हिंगोली नांदेड परभणी लातूर या जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना मध्यंतरी जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत आणि भाग सोडत ही या जिल्ह्याची कहाणी आहे..
ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाय त्याच ठिकाणी हा पाऊस राहील या भागांना पाऊस कमी त्यांनाही थोडा दिलासा मिळणार आहे..
याच जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील उत्तर मध्य मराठवाडा जसे की जालना तालुका मंठा घनसावंगी अंबड वाटुर परतुर भोकरदन जाफराबाद व कन्नड सिल्लोड पैठण छत्रपती संभाजी नगरचे सर्व तालुक्यांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस मात्र वाऱ्यामुळे काही ठिकाणी टिकणार नाही पण दिलासा मात्र बऱ्यापैकी 60 टक्के भागांना मिळेल..
विदर्भ विभाग..
पूर्व विदर्भामध्ये सुरुवातीला पाहूयात.
गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन काळे कुट्ट ढगांची गर्दी होऊन प्रत्येक तालुक्यात 25% भागांना पाऊस होणार पाऊस मेघगर्जनेसह जोरदार कुठे मध्यम स्वरूपाचा होय..
तर बुलढाणा चिखली खामगाव मेहकर शेगाव लोणार वाशिम रिसोड या परिसरामध्ये 18 तारखेला 19 तारखेला काही ठिकाणी 20 21 ला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे देऊळगावराजा परिसरातही काही ठिकाणी मेघ गर्जना चे प्रकार घडतील..
वारे जोराने वाहत असल्यामुळे पाऊस भाग बदलत राहील..
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा आढावा..
नाशिक अहमदनगर मालेगाव सातारा पुणे या भागांमध्ये पाऊस तुरळीत ठिकाणी 15 ऑगस्टला राहील पण मोजकेच ठिकाणी..
21 22 ऑगस्ट च्या काळामध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत राहील मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपात राहील खंडाच्या झाडा या भागामध्ये सर्वाधिक राहतील..
सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन.मोजक्या ठिकाणी राहील..
दक्षिण महाराष्ट्रामध्ये.
15-20 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे..सोलापूर सांगली कोल्हापूर व तसेच धाराशिव पट्ट्यामध्ये भाग बदलत पाऊस असेल काही ठिकाणी नुसतं वातावरण बनेल शितोडे पडतील.
तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळतील मात्र सर्व दूर नाही..
सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी या भागात काही ठिकाणी जोरदार आगमन होईल..
खानदेश विभागामध्ये ..
15 ऑगस्ट रोजी पश्चिम भागामध्ये नंदुरबार धुळे हलक्या सरी कोसळतील ढगाळ वातावरण होईल..
मात्र 19 20 21 या काळामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे सर्वदूर पाऊस नाही..
इकडे वातावरण पावसाचे चांगले बदलणार आहे जळगाव सर्व तालुक्यांमध्ये पाऊस 20 21 च्या काळामध्ये होणार आहे.. ऑगस्ट महिन्यामधील तारका याप्रमाणे राहतील..
सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी तोडकर हवामान अंदाज लाईव्ह जॉईन करत चला. धन्यवाद