पावसाची विश्रांती सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो..

राज्यात धो धो बरसणारा आता कमी होईल…

THFS WHEATHER Update 25 AUGUST..

मागील आठवड्यापासून भाग बदलत धो धो बरसणारा पाऊस आता विश्रांती घेणार आहे, मात्र विश्रांती ही ठराविक ठिकाणी कमी प्रमाणात राहील या संदर्भात सविस्तर आढावा खालील प्रमाणे..

मराठवाड्यात…

जालना बीड छत्रपती संभाजी नगर हिंगोली नांदेड लातूर धाराशिव..जालन्यामध्ये आजही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच 26 27 ऑगस्ट पासून भाग बदलत उघडीप होणार आहे.. ही विश्रांती चार ते पाच दिवस एवढीच राहील व या काळातही पंधरा टक्के भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस राहू शकतो..नांदेड मध्ये ही स्थानिक वातावरणाचा पाऊस या विश्रांती च्या काळामध्ये राहू शकतो..वरील जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस आता पाच सात दिवस नाही..या काळात आधुन मधुन ढगाळ वातावरण व हलक्या सरी कोसळत राहील….पणं जास्त प्रमाणात नाही…

विदर्भात…

मागील आठवड्यापासून तसेच काही ठिकाणी 25 दिवसापासून पावसाचा जोर कायम होता तर याच भागांमध्ये काही ठिकाणी पीक पाण्यावरती ही आली होती..मात्र आता अति पाण्यामुळे पिके धोक्यात आहे..यांना मात्र विश्रांतीचा चांगला दिलासा आहे..बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये 27 पासून ते एक सप्टेंबर पर्यंत पाऊस 85% उघडीत देणार आहे 15 टक्के भागांना मात्र स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील..अमरावती नागपूर यवतमाळ गडचिरोली हिंगणघाट चंद्रपूर भंडारा गोंदिया..या जिल्ह्यांना मात्र तीन दिवसाचीच विश्रांती आहे 27 ऑगस्ट पासून ही विश्रांती सुरू होईल..व 29 तारखेला मध्य रात्री पासुन वातावरण सक्रिय.व तीस तारखेला या जिल्ह्यात पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली… शेतकरी बांधवांनो उघडीप ही जास्त प्रमाणात नाही..अती पावसामुळे स्थानिक वातावरण काही ठिकाणी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.. सर्व ठिकाणी मात्र नाही..

खानदेशात..

नंदुरबार शहादा जळगाव मालेगाव परिसरात 25 आणि 26 ऑगस्टला पाऊस सक्रिय आहे. या भागांमध्ये विश्रांती 27 पासून ते सात ते आठ दिवस राहील म्हणजेच तीन तारखेपर्यंत विश्रांतीचा काळ यांना मिळू शकतो..जास्त पाऊस झाल्यामुळे किंवा काही ठिकाणी गरमीचे प्रमाण जास्त असल्यास स्थानिक वातावरणाचा पाऊस दहा टक्केच भागांना राहू शकतो..त्यामुळे इतर पिके काढणीस आल्या काढण्यासाठी योग्य संधी मिळणार आहे. पुढील काळात यांना खूपच पाऊस जास्त राहणार आहे..

पश्चिम महाराष्ट्र. 

पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना म्हणजेच अहमदनगर सातारा सांगली पुणे ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा जोर आणि ढगाळ वातावरण हे 27 तारखेपर्यंत ही राहू शकते. मात्र 27 तारखेला याच भागांमध्ये काही ठिकाणी 50% ते 60% विश्रांती मिळणार आहे..व 28 पासून ते चार सप्टेंबर पर्यंत या भागांमध्ये पाऊस आपला प्रभाव कमी करून विश्रांती घेत आहे..त्यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरळीत चालतील. व जास्त पाऊस झालेला ठिकाणी पिकांना परत कडक उन्हामुळे चांगला दिलासाही मिळणार आहे..यांनाही परतीचा प्रवास खूपच जबरदस्त राहणार आहे..

 

पुढील अपडेट..

समस्त शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा दोन ऑगस्ट किंवा तीन ऑगस्ट च्या कालावधीमध्ये पावसा जोर वाढत आहे..तर पूर्व विदर्भात 30 तारखेपासूनच पावसाचा जोर वाढणारे..सप्टेंबर महिना एवढाही खतरनाक नाही..

ज्यामुळे आपणास धास्ती वाढते प्रतीच्या पावसाची..प्रतीच्या पावसा बाबतीत 25 ऑगस्ट चा लाईव्ह तोडकर हवामान अंदाज youtube चैनल वरती सविस्तर स्वरूपामध्ये देण्यात येईल..

सर्वांनी चैनल ला भेट द्यावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top