नाशिक अहमदनगर मालेगाव सातारा पुणे संभाजीनगर हवामान अंदाज…
THFS WHEATHER technology JALNA..
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून खंडाच्या झळा या जिल्ह्यांना जाणवत आहेत..
कुठे रिमझिम पाऊस तर मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस या काळात देखील पडत आहे …पण त्याची व्याप्ती ही दहा ते पंधरा टक्के आहे उर्वरित 85 टक्के भागांना मात्र अजूनही पिण्यायोग्य किंवा विहिरी सारख्या स्त्रोतांना पाणी नाहीये..
पण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे..
दिनांक 20 ,21 ,22 ऑगस्ट
या तारखे दरम्यान दररोज 45% भाग घेण्याची व्याप्ती असणारा पाऊस..
सक्रिय होणार आहे..
व दिनांक 17 18 19 या कालावधीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे पण भाग बदलत सकाळच्या वेळेला काही ठिकाणी हलक्या सरी.. तर गर्मीची लेवल वाढल्यामुळे मोजक्या भागांमध्ये जोरदार सरी.. तर कुठे एक दोन ठिकाणी मेघगर्जनेचे प्रकार देखील वरील जिल्ह्यामध्ये घडतील..
नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा मालेगाव परिसर 19 आणि कॉमन तारीख 20 ऑगस्ट या तारखे दरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे या काळात अहमदनगर जिल्ह्याच्या दोन्ही बाजूला चांगला राहील पुण्याला सुद्धा कोकण किनारपट्टी पर्यंत चांगला जोर असणार आहे..
छत्रपती संभाजी नगर जालना सातारा सांगलीचा सुद्धा याच तारखेमध्ये पावसाच्या बाबतीत समावेश होत आहे..
आता पाहूयात आपण पूर्व मराठवाड्याची उर्वरित भागांची कंडिशन..
नांदेड जिल्ह्यात सलग तीन दिवस सकाळ-संध्याकाळ पावसाची शक्यता आहे भाग मात्र 25 ते 30 टक्केच घेईल उर्वरित भागांना या पावसाची वितळण पडू शकते म्हणजे बारिक थेंबाचा किंवा झडी सारखेच थेंबाचा..
बुलढाणा जळगाव तसेच अकोला अमरावती या भागात देखील 19 20 ऑगस्ट कालावधीमध्ये पावसाचा जोर चांगला राहील भाग घेण्याची व्याप्ती 45 टक्के आहे दोन दिवस चांगला पाऊस असल्यामुळे टक्केवारी मध्ये वाढ चांगली होणार आहे..
श
प्रिय शेतकरी मित्रांनो खंडाच्या बाबतीत बऱ्याच जणांचे गैरसमज झालेत..
25 जुलै च्या तोडकर हवामान अंदाज लाईव्ह मध्ये सविस्तर सांगितल्याप्रमाणे खंड 50% युक्त कमी आहे..
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस तर काही एक दोन ठिकाणी अति मुसळधार देखील होतोय.. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि जालना छत्रपती संभाजी नगर बीडमध्ये सुद्धा पिकांना पाण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे यालाच खंडात म्हणतात आणि जो अखंडपणे चालू राहतो त्यामध्ये विश्रांती घेतली जाते त्याला खंड देखील म्हणतात..
यंदाचा प्रतीचा प्रवास देखील तोडकर हवामान अंदाज लाईव्ह मध्ये आपण सविस्तर स्वरूपात सांगितला आहे तो देखील चैनल वरती जाऊन पाहू शकता…
धन्यवाद हा माहिती सर्व शेतकरी मित्रांना पाठवा..
साहेब सिंदखेडराजा परिसर जसे उगलेपांगरी कींनगाव राज्या पतीसरात पीक सुकू लागलीत,इथे पाऊस आहे का ह्या 5 दिवसात
पाऊस तीन दिवसांत..१९-२०-२१