थंडीचे दिवस पुन्हा सक्रिय होणार..
तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा,डहाळेगाव
राज्यभरात ढगाळलेली परिस्थिती पाहता वातावरण मागील अपडेट दिलेल्यानुसार मोकळी झाली आहे..
धुई धुक्याचं वातावरण हे पूर्णपणे पूर्ण क्षमतेने कमी झाले आहे धुईमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्यात कडाक्याची थंडी येत्या 24 तासांमध्ये वाढणार आहे.
दिनांक 10 आणि 11 ऑक्टोबर राज्यात सर्व दूर थंडीचा कडाका वाढणार आहे आता पाहूयात विभागानुसार माहिती..
खानदेश विभाग..
नंदुरबार शहादा धुळे जळगाव मालेगाव नाशिक परिसर..
या भागांमध्ये दहा तारखेला पहाटच्या वेळेला मध्यम ते काही ठिकाणी जास्त प्रमाणात थंडीची लेवल वाढणार आहे दिनांक 11 डिसेंबर या रोजी वातावरण हे आणखीन थंडीचे वाढेल. 12 अंश सेल्सिअस वरती जाणार आहे..
अधून मधून धुरकट वातावरण ही होत राहील याचा परिणाम फारसा मोठा नाहीये.
मराठवाडा विभाग ..
जालना बीड छत्रपती संभाजी नगर नांदेड हिंगोली, लातूर धाराशिव परभणी या भागांमध्ये थंडी दहा तारखेला सकाळच्या वेळेला तीव्रतेमध्ये वाढ होईल तर 11 डिसेंबरला पारा 12 अंश सेल्सिअस मध्ये जाईल त्यामुळे थंडीचा कडाका येत्या 24 तासांमध्ये चांगलाच वाढणार आहे सकाळ संध्याकाळ ही थंडी कायम टिकून राहील दिवसा उन्हामध्ये सुद्धा गारवा जाणू लागेल त्यामुळे मागील काळामध्ये पावसाने कांदा उत्पादक द्राक्ष उत्पादक तुर उत्पादक तसेच अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर पडलेल्या रोगांवरती चिंता आता या आठवड्यामध्ये दूर होईल..
विदर्भ विभाग ..
बुलढाणा अकोला वाशिम या भागामध्ये वातावरण हे सूर्य प्रकाशित राहून थंडीमध्ये सुद्धा दहा डिसेंबरला चांगला कडाका वाढेल 12 डिसेंबर पासून सुद्धा थंडीमध्ये चांगलाच कडाका देखील पाहायला मिळणार आहे पूर्व विदर्भामध्ये मात्र ढगाळलेली परिस्थिती नऊ डिसेंबर 10 डिसेंबरला सुद्धा पाहायला मिळेल मात्र इथेही थंडीचा कडाका 11 डिसेंबर पासून चांगलाच वाढणार आहे.. पूर्व विदर्भामध्ये 14 डिसेंबर 15 डिसेंबर कालावधीमध्ये ढगाळलेली परिस्थिती धुळीचं वातावरण देखील पाहायला मिळणार..
पश्चिम महाराष्ट्र विभाग..
पश्चिम महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण राहील नाशिक अहमदनगर पंढरपूर सोलापूर पुणे ठाणे पालघर मुंबई या भागांमध्ये…
थंडी या भागातही येत्या 24 तासांमध्ये कोणत्याही क्षणी वाढायला सुरुवात होईल दिवसभर वातावरण हे अंधुक आणि थंडीचे राहील सकाळ संध्याकाळच्या थंडीमध्ये 12 ते 13 अंश सेल्सिअस वरती जाणार आहे..
दक्षिण महाराष्ट्र विभाग..
सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी एरियामध्ये वातावरण हे 14 आणि 15 डिसेंबर मध्ये ढगाळलेल्या पाहायला मिळणार आहे थंडीही त्याच पद्धतीने त्या चोवीस तासांमध्ये कोणत्याही क्षणी वाढणार आहे..
या काळामध्ये सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी व तसेच पणजी गोवा या भागामध्ये वातावरण हे पंधरा-सोळा डिसेंबरच्या कालावधीमध्ये धुई धुकं ढगाळलेली परिस्थिती किरकोळ हलक्या सरी.. मोजक्या दिवसा करता राहील..
काळजी नसावी थंडीही त्याच पद्धतीने 11 डिसेंबर पासून वाढणार आहे..
टीप.. सविस्तर माहितीसाठी तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब चैनल वरती नेहमी लाईव्ह अपडेट दिली जातात त्यासाठी तोडकर हवामान अंदाज चैनल यूट्यूब वरती सर्च करून संध्याकाळी सात वाजता लाईव्ह मध्ये हजर राहावे..