मुक्काम पोस्ट भुमराळा, तालुका लोणार सरोवर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र.
यावर्षी सोयाबीन उगवणीनंतर फवारणी करावयाचे सर्व तणनाशकाचा फारसा उपयोग न होता शेतात तण जसेच्या तसेच राहून आता ते जोमाने वाढायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केल्यानंतर ताबडतोब मॅक्स व राऊंडअप,या तणनाशकाची फवारणी केली तर सोयाबीन पीकामध्ये चांगल्या प्रकारे तणनियंत्रण ठेवता येते,
मागच्या वर्षी मी स्ट्रॉंगआर्म सोबत ओझोन या दोन्ही तणनाशकाची फवारणी केली होती,
पण पंधरा दिवसांनी पुन्हा तण उगवायला सुरू झाले होते, यावर्षी मॅक्स व राऊंडअपची फवारणी केली,तर 18 जूनला पेरणी केली होती, आणि त्या सोयाबीन मध्ये अजूनही तण उगवले नाही.
आता सोयाबीन पुर्ण फटी झाकून गेली, त्यामुळे आता इथून पुढे तण उगवले तरी ते बारीक बारीकच राहते,व जेव्हा सोयाबीन परिपक्व झाले व पाने पिवळी होऊन गळायला लागली, तेव्हा ते तण वाढायला सुरुवात होते, पण तेव्हा पुन्हा एकदा राऊंडअप किंवा मिरा 71 ची फवारणी केली की तिथून पुढे शेत पुर्ण तणमुक्त होऊन रानाचा कस कायम राहून पुढे गहू हरभरा, किंवा कोणतेही रब्बी पीक भरपूर येते,कारण शेतातील अन्नद्रव्ये गवत आणि तण नसल्याने कायम राहून पुढच्या पीकास लवकर व सहज उपलब्ध होऊन पुढचे पीक भरघोस प्रमाणात येऊन फायदा होतो.