अखेर धुई धुकं सांगितलेल्या प्रमाणे पडलं.आज या जिल्ह्यात जोरदार…
THFS Wheather update 18 August.. live..
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तीन दिवसापूर्वी धुई ,धुक्यांची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना दिली होती..
त्याचप्रमाणे ठिकठिकाणी आज आपल्याला तसेच धुरी पाहायला मिळते आहे..
आता पाहू आजचा पाऊस कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक जोर धरून लागणार आहे..
मराठवाड्यात या जिल्ह्यात..
जालना बीड छत्रपती संभाजी नगर परभणी लातूर धाराशिव नांदेड..
या जिल्ह्यांमध्ये 40 ते 45 टक्के भागांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.. यातीलच उर्वरित भागांना फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी कोसळतील सर्वजण पाऊस नाही पुढील तीन दिवसात उर्वरित भाग कव्हर कळेल..
खंडाच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या तारखेप्रमाणे पाऊस देखील आपला प्रभाव टाकत आहे याची नोंद घ्यावी..
संभाजीनगर मधील जिल्ह्यांमध्ये वैजापूर पैठण कन्नड सिल्लोड भागात 20 21 ला चांगला जोर दाखवणार आहे..
व तसेच विविध तालुक्यातील गरजू भागांनाही लवकरच 48 तासात आपला प्रभाव पूर्ण करेल.
पश्चिम महाराष्ट्रात या जिल्ह्यात..
अहमदनगर नाशिक पुणे सांगली सातारा पंढरपूर सोलापूर कोल्हापूर..
मागील आठवड्यापासून सतत सांगितल्याप्रमाणे या भागांमध्ये भाग बदलत पावसाला सुरुवात झाली आहे.
दिलेल्या टक्केवारीनुसार पाऊस पडतो आहे सर्व दूर नाही..
पण 21 ते 22 ऑगस्ट पर्यंत या भागांमध्ये सर्वजण पाऊस होईल तोपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार त्यासाठी ठिकाणी विजांच्या कडकडाटात मध्ये पाऊस होईल.
टक्केवारी सुरुवातीला 18 19 ऑगस्ट ची 25 ते 30 टक्के भागातच आपला प्रभाव टाकेल.
आणि 21 22 ऑगस्ट पर्यंत सर्व भाग व्यापील..
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये..
या जिल्ह्यातील 30 टक्के भागांना पावसाने अक्षरशः कदरून टाकले.
पण यातही काही तालुके असे आहेत की त्यांना पावसाची गरज भासत आहे..
20 21 ऑगस्ट दरम्यान खामगाव चिखली मेहकर सिनखेडराजा शेवगाव या भागात पावसाची हजेरी आहे..
तोपर्यंत मोजक्या ठिकाणी आपला प्रभाव मुसळधार ती जोरदार पद्धतीने दाखवत चालेल..
व रोहित जिल्ह्यांना वाशिम अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या भागातही भागच बदलत पण पडलेल्या भागांना पुन्हा पुन्हा हा पाऊस एक-दोन दिवसा पडत राहील धुईचा प्रादुर्भाव अधिक राहील..
खानदेशामध्ये लवकरच..
सर्वाधिक मुसळधार झालेला मागील काळातील हाच भाग यातील नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव पर्यंतच्या भागात चांगला पाऊस झालाय..
पण कोरडवाहू शेतकऱ्यांना अति गर्मीमुळे गरज भासत आहे..
यांच्या भागातही 18 19 ऑगस्ट च्या काळामध्ये हजेरी लावेल..
पण सगळीकडे चांगला पाऊस.
दिनांक 21 22 23 या ऑगस्ट कालावधीमध्ये सुरुवात करेल.
यांना पुन्हा मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
शेतकरी मित्रांनो गर्मीची लेवल हे कायमस्वरूपी राहणार आहे.
त्यामुळे धुई धुकं धुरी चा पादुर्भाव ही अधून मधून होत राहील.
त्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सज्ज रहावे.
धन्यवाद तोडकर हवामान अंदाज.
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करू शकता.. स्क्रीनवर दिसत असल्या बटनावरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप वरती ठीक तुम्ही येऊ शकता. किंवा सविस्तर माहिती लाईव्ह च्या माध्यमातून पाहण्यासाठी तोडकर हवामान अंदाज यूट्यूब चैनल वर लाईव्ह दररोज साडेआठ वाजता पाहायला मिळतोय.