राज्यात सुर्यदर्शनाचा हवामान अंदाज

राज्यात सर्वत्र वातावरण मोकळे व सुर्य दर्शन होणार,

पुढील तीन दिवस वातावरण सुर्यदर्शन खालील प्रमाणे 

🌤️ *THFS wheather Technology JALNA*
Rainfall update -26 July..
(Todkar Havaman andaj research report..)
*🌤️सुर्यदर्शनाचा हवामान अंदाज जिल्ह्यानुसार विभागानुसार.☀️.*
*🔸१.मराठवाड्यात ☀️💯 अंदाज* .
*दिनांक 29-31 सुर्य दर्शन खालील प्रमाणे*
संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली

मराठवाड्यातील या सर्व जिल्ह्यांना दिनांक 29 जुलै सूर्य दर्शन सकाळी आठ नऊच्या दरम्यान होईल
दिवसभर वातावरण थोडेफार ढग आणि मोकळी राहील शेती कामे करता येईल कुठल्याही प्रकारचा फवारणीसाठी अडथळा नाहीये. पुढील तीन दिवस वातावरण मोकळेल मात्र 30 आणि 31 ला स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या ठिकाणी तुरळ गावांना पाऊस राहील जास्त काही मोठा नाहीये.
..
*🔸२.विदर्भात 🌤️ अंदाज..*
*दिनांक 29-31 सुर्य दर्शन खालील प्रमाणे*
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा
या जिल्ह्यांना मागील आठवड्यापासून चांगलाच पाऊस झालेला आहे या भागातही उद्या लवकरच सकाळच्या वेळेलाच दिनांक 29 जुलै पासून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरणार आहे त्यामुळे शेती कामांना वेग येईल पुढील तीन दिवस पाऊस नाही ती 31 जुलै पर्यंत पाऊस नाही.. शेती कामे बिनधास्त करायची फवारणी वगैरे पिकांचे नियोजन करायचे.

*🔸३.पश्चिम महाराष्ट्रात 🌤️ अंदाज* ..
*दिनांक 29-31 सुर्य दर्शन खालील प्रमाणे*
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे
वरील भागामध्ये पावसाची शक्यता दिनांक 29 पूर्णपणे कमी होईल सूर्यप्रकाशित वातावरण सकाळी नऊ वाजता निर्माण होईल..
पुढील तीन दिवस वातावरण हे विश्रांतीचे राहील मात्र 30 आणि 31 जुलैला स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्व नाहीये.

*🔸४.दक्षिण महाराष्ट्रात 🌤️ अंदाज* ..
*दिनांक 29-31 सुर्य दर्शन खालील प्रमाणे*
सोलापूर कोल्हापूर सातारा
या जिल्ह्यांना वातावरण तसं पाहायला गेलं तर जास्त काही मोकळं नाहीये.
पण जो जोर होता तो चांगला ओसरणार आहे..
त्यातलेही काही भागांना शेतातील कामे कळाला अडचण येणार आहे मात्र स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या सरी दुपारनंतर कोसळतील..

*🔸५.खानदेशात 🌤️ अंदाज* ..
**दिनांक 29-31 सुर्य दर्शन खालील प्रमाणे**

धुळे नंदुरबार शहादा जळगाव
आज 28 जुलैला या भागांमध्ये दमदार तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता जास्त होती आणि ती झाली देखील मात्र या शेतकऱ्यांना सुद्धा सूर्य दर्शनाची खूपच आस आहे आणि चक्क उद्या सकाळपासूनच वातावरण हे मोकळी होत सुदर्शन 9 ते 10 वाजेपर्यंत यांना दिसेल आणि फवारणीसाठी योग्य वेळेला दहा वाजल्यापासून ते संध्याकाळच्या साडेचार वाजेपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत राहील त्यामुळे बिनधास्त फवारणी करायची शेती कामे करायचे.. वातावरण पुढील तीन दिवस हे मोकळे असणार आहेत आणि 31 जुलै दरम्यान मोजक्या ठिकाणी पाऊस राहील..

*६. कोकण किनारपट्टी..रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…*
सुर्य दर्शन शक्यता कमी राहील मात्र जोर ओसरेल…. मागील काळामध्ये जेवढा पाऊस झाला त्या पावसानंतर आता हा जोर ओसरणार आहे..
पुढील अपडेट…. राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं.3ते6 ऑगस्ट- पाऊस सक्रिय होईल…

🔰 *याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..*
todkarhavamanandaj.com
किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…
*तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*
📌 टीप. तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळेचे हवामान अपडेट मेसेजेस बंद करण्यात आले आहेत.. सविस्तर माहिती तोडकर हवामान अंदाज ऑफिस वेबसाइट वर नेहमी दिली जाते..👇
todkarhavamanandaj.com
🔸⛈️🌤️🔸💯💯☀️☀️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top