यलो मोझॅक प्रभावी उपाय

सोयाबीन येलो मोझॅक

श्री शिंदे सर
*9822308252*
🙏🙏
शेतकरी बंधुनो,
आपल्या भगवती सिड्स च्या सर्वच ग्रुप वर सोयाबीन या पिकाच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिवळे पडत असल्याचे सांगितले, त्यासाठी हा लेख प्रपंच.
मित्रानो सोयाबीन हे पीक विदर्भ, मराठवाडा व खान्देशात मोठया प्रमाणात घेतले जाते,
महाराष्ट्रात सोयाबीन हे पीक जवळजवळ 38 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते, गेल्या 3/4 वर्षांपासून सोयाबीन वर *पिवळा मोझॅक* या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर अटॅक येत आहे,त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते.हा रोग खूप झपाट्याने पसरतो पेरणी नंतर 20 व्या दिवशीच याची लक्षणे दिसायला लागतात,पहिले शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर दिसतात, पानांच्या कडा करड्या दिसतात ,पानाच्या शिरा गर्द हिरव्या व पान लहान राहते,आतून वाट्यांसारखे होते अशा झाडांना कवचितच शेंगा लागतात लागल्याचं तर वेड्यावाकड्या असतात व त्यात दाणे भरत नाहीत पोकळ राहतात, हळूहळू संपूर्ण झाड पिवळे पडते व शेवटी वाळून जाते.काही वेळेस पेरणीकेल्यानंतर10/15दिवसाचा पावसाचा खंड पडला व नंतर पाऊस पडला तर सोयाबीनचे पीक पिवळे दिसायला लागते, म्हणजे येलो मोझॅकची लक्षणे दिसायला लागतात, उपाय केले नाही तर संपूर्ण शेतात हा रोग पसरतो .हा रोग विषाणूजन्य आहे, यावर अचूक असा कोणताच इलाज नाही. हा विषाणूजन्य रोग *मुंगबिन येलो मोझॅक* या विष्णूमुळे होतो, या रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशी मुळे होतो, डाळ वर्गीय कडधान्ये पिके मुंग,उडीद, चवळी,मटकी, वाल ,सोयाबीन या पिकांवर पेरणी केल्यानंतर 20 व्या दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाय करणे फायद्याचे ठरते.
*उपाय*
वरील सर्व पिकात एकरी 10/15 चिकट सापळे/पॅड लावावेत.
मावा आणि पांढऱ्या माशी च्या नियंत्रनासाठी पेरणीनंतर 25 आणि 32 दिवसांनी फवारणी आवश्यक असते.
1) पहिली फवारणी 20 दिवसांनी करावी.
👇
*5 मिली इमिडक्लारप्राईड,*किंवा35 मिली मोनोक्रोटोफॉस*किंवा 10 मिली फॉस्फोमीडॉन*
यापैकी एक
+
*30 मिली 20%चे क्लोरोपायरीफॉस*
+
*15 मिली दहा हजार पीपीएम चे निमार्क*
+
*5 मिली सिलिकॉन स्टिकर*

2)दुसरी फवारणी 30 ते 32 दिवसांनी करावी.
👇
*35 मिली ट्रायझोफॉस,*
+
*5 मिली सिलिकॉन स्टिकर,*
+
*15 मिली दहाहजार पीपीएम* *निमार्क,*
+
*अळी असल्यास इमामेकटीं बेंझोइट 8 ग्रॅम*

पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ नये म्हणून या पिकावर कोणत्याही परिस्थितीत सिन्थेठिक पायराथराईड कीटकनाशकांचा वापर करू नये

येलो मोझॅक हा विषाणू जन्य रोग आहे शेतात अशी रोगग्रस्त झाडे आढळल्यास उपटून जमिनीत गाडून टाकावीत.
ह्या रोगामुळे पिकाचे 50 ते 90% पर्यंत नुकसान होऊ शकते.
सोयाबीन पिकात 60 दिसानंतर चक्री भुंगा आढळतो ,हा भुंगा खोडाच्या आत घुसून मुळापर्यंत खोड पोखरतो,वरील दोन फवारणी जर वेळेवर केल्या तर चक्री भुंग्यावरही नियंत्रण मिळवता येते.
धन्यवाद.
🙏🙏
*श्री शिंदे सर*
*9822308252*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top