राज्यात धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल का..व कारणं...
THFS WHEATHER update 31 July..
तोडकर हवामान अंदाज…
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार ते जोरदार पावसाची हजेरी आपण पाहिले आहे ..त्याचबरोबर काही मोजक्या धरणामध्ये आवकही वाढली आहे..
21 जुलै 2024 रोजी दिलेल्या अंदाजानुसार काही धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे..
याचबरोबर आज 31 जुलै एक धरणांच्या बाबतीत एक अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय हाही अंदाज का खरा होणार या बाबतीत तुम्हाला सविस्तर माहिती देतो..
मागील वर्षी 2023 मध्ये अनिनो कंडिशन होती पाऊस भाग बदलत मोजक्या ठिकाणी पडायचा आहे तर काही ठिकाणी नुसता बारीक पडायचा..
पण यंदा 2024 मध्ये ला-निनो कंडीशन आहे..
त्यामुळे महाराष्ट्रात परतीचा प्रवास हा मुसळधार ते अति मुसळधार राहणार आहे.. सर्वाधिक चांगला जोर पश्चिम महाराष्ट्राचा ही पाहायला मिळणार आहे मात्र सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा एवढा कालावधी लागेल..
ऑगस्ट महिन्यातही पहिल्या आठवड्यामध्ये बर्याच ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे कारण उष्णतेची तीव्रता ही ह्युमिडिटीची लेवल वाढू शकते..
सुर्य दर्शन 1 पर्यंत नंतर पुन्हा झडीच वातावरण निर्माण होईल..
त्यामुळे दिं.6-7 पर्यंत पाऊस ढगाळ वातावरणामुळे राहील..
मान्सून परतीचा प्रवास..
मित्रांनो मान्सून हा हिमालया पर्यंत धडकतो तेथे पोहोचला की तिथून परतीचा प्रवास 10-12 सप्टेंबर या महिन्यामध्ये सुरू करणार आहे..
महाराष्ट्रात यंदा एकही धरण कोरडे राहणार नाही..
तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव
Jath sangli kadhi paus yeil
हो सर