तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा, जालना..
दिं.11/11/2024 अपडेट..
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा दक्षिण भारतातील तमिळनाडू आंध्रप्रदेश कर्नाटक राज्यात आज मध्यरात्रीपासून आगमन.
महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये याचा परिणाम खालील प्रमाणे..
राज्यात वातावरण निर्माण होईल..
दक्षिण महाराष्ट्रात व मराठवाड्यात येत्या 72 तासांत ढगाळ वातावरण निर्माण होईल..
दिं. 18 पर्यंत खालील प्रमाणे पावसाचा अंदाज आहे…
विदर्भात..
नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा यवतमाळ हिंगोली..
दिं..14-15 नोव्हेंबर ढगाळ वातावरण राहील पाऊस नाही,
वातावरणातील बदलामुळे तुर गहू ज्वारी हरभरा पिकांना अळी चा प्रादुर्भाव दिसून येतो….
धुई धुकं दाट राहील..
तुर गहू हरभरा ज्वारी पिकाची पाहणी करून योग्य नियोजन तयारीत रहावे…
आभाळ आल्यावर तुर पिकांना गरज नसल्यास पाणी देणे टाळावे..
दक्षिण महाराष्ट्रात,मराठवाड्यात...
लातूर सोलापूर सांगली धाराशिव पंढरपूर बीड परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये 14-15 नोव्हेंबर ढगाळ वातावरण राहील.
परीस्थिती दिं.14-15 नोव्हेंबर पावसाची शक्यता आहे..
30% भागात पाऊस राहील..
मध्यम स्वरूपाचा ते तुरळक ठिकाणी सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर जोरदार सरी कोसळतील सर्व ठिकाणी नाही…
वातावरण चार दिवस खराब राहील..
पण धुकं ढंग दहा दिवस राहिल.
कोकण किनारपट्टी भागात..
दिं.13-18नोंव्हेबर या काळात कोकणात जोरदार आगमन होईल..
50% भागात दिं.14-15-16नोंव्हेबर रोजी पाऊस राहील..
भात उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट आहे..
कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे मुंबई पालघर बरोबर संपूर्ण कोकणात वातावरण चार पाच दिवसांसाठी खराब आहे…
खानदेश पश्चिम महाराष्ट्र विशेष..
नाशिक संभाजीनगर अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये
दिं..14-15 नोव्हेंबर ढगाळ वातावरण राहील पाऊस नाही,
वातावरणातील बदलामुळे तुर गहू ज्वारी हरभरा पिकांना अळी चा प्रादुर्भाव दिसून येतो….
धुई धुकं दाट राहील..
पावसाचा धाक नाही..
धुई धुक्यांचं वातावरण अधिक असल्याने पिकांना या जिल्ह्यामध्ये हे वातावरण धोकादायक ठरू शकते..
टिप…हा पाऊस सर्व ठिकाणी सर्वदूर नाही.. त्यामुळे वरील दिलेल्या माहितीनुसार नियोजन तयारीत रहावे…
पुढे ही वातावरण दिं.27-28 नोव्हेंबर असेच बिघडणार आहे.. त्यामुळे सविस्तर माहिती लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे..
तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव.
धन्यवाद सर