परतीचा मान्सून जिल्ह्यात

यंदा परतीचा प्रवास मुसळधार,
राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह पाऊस.
THFS WHEATHER Update..
महाराष्ट्रात राज्यभर पुन्हा मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होईल,
परीस्थिती काही ठिकाणी चिंता वाढवणार..ऐन सोयाबीन सोंगणीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाट..
जिल्ह्यानुसार कसा बरसणार,
खालील प्रमाणे सविस्तर माहिती पाहू..

विदर्भात परतीचा प्रवास…
बुलढाणा अकोला अमरावती वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम हिंगणघाट भंडारा नागपूर चंद्रपूर.
या जिल्ह्यात सर्वाधिक विजांच्या कडकडाटात दिं.20-21सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
.
या भागात काही ठिकाणी वातावरण 17 सप्टेंबर कालावधीत बिघडणार आहे..
नागपूर गोंदिया भंडारा वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी 17-18 पासून पावसाचा अंदाज आहे… काही मोजक्या ठिकाणी पाऊस राहील..
मात्र परतीचा प्रवास मुसळधार राहणार…
विजांचा प्रचंड धोका निर्माण होईल असा अंदाज आहे..

मराठवाड्यात परतीचा प्रवास..
जालना बीड संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली
या जिल्ह्यात 21 सप्टेंबर पासून परतीचा भाग बदलत मेघगर्जनेसह धुई धुक्यांत पाऊस होणार आहे..
सलग पाच दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..
सोयाबीन सोंगणीचा‌काळ आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात सोबत आहे..
विजांचा प्रचंड गडगडाट आणि मुसळधार..

पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात.
सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर अहमदनगर पुणे नाशिक ठाणे पालघर
या जिल्ह्यात ही परतीचा प्रवास मुसळधार..
दिनांक 22 सप्टेंबर पासून परतीचा मान्सून यंदा ही लेट पण थेट धो धो बरसणारा..
या जिल्ह्यात काही ठिकाणी कमी आधीक प्रमाणात पण या पहिल्या टप्प्यात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे..27 सप्टेंबर पर्यंत सर्व ठिकाणी पाऊस मेघगर्जनेसह जोरदार होईल..

खानदेश विभाग...
जळगाव धुळे नंदुरबार शहादा परीसरात..
यंदा परतीचा प्रवास चांगला धुंवाधार पावसाचा अंदाज..
दिनांक 14-15-16 सप्टेंबर रोजी स्थानिक वातावरण निर्माण होईल मोजक्या ठिकाणी पाऊस राहील…
पण दिं.20 सप्टेंबर नंतर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटात भाग बदलत पाऊस सक्रिय होईल..
दररोज दुपारनंतर हजेरी लावणार..
नदी नाले ओढे वाहतील..

नियोजन व महत्त्वाच्या अंदाज..
यंदा परतीचा प्रवास दोन टप्प्यांत बसण्याची शक्यता दाट आहे..
परतीचा प्रवास 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील, त्यामुळे सोयाबीन सोंगणीत नियोजन लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे.
ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना पाठवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top