तोडकर हवामान अंदाज लाईव्ह अपडेट..
29 September rainfall update live..
आज स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस राहील कोल्हापूर सांगली..
आज पासून उघाड, नंतर पुन्हा बिघडणार.
पुर्व विदर्भात..
नागपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा अमरावती
या जिल्ह्यात काही ठिकाणी आभाळ दुपारनंतर भरून येईल.
पण आता दोन तीन दिवस विश्रांती घेत आहे…
दिनांक 6-7 ऑक्टोबर पासून पुन्हा
काही ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील.. विजांचा प्रचंड गडगडाट पाऊस राहील. दिनांक 7 ऑक्टोबर पासून
पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस राहील.
मराठवाड्यात..
जालना बीड संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली
या जिल्ह्यात विश्रांती पण आज भाग बदलत ढगाळ वातावरण कायम राहील मोजक्या ठिकाणी दुपारनंतर तुरळक शितोडेतर काही ठिकाणी दिवस मावळतीला काळेभोर ढगाळ वातावरण निर्माण होईल.. पाऊस नाही विश्रांती आहे तीन,चार दिवस..
दिनांक 3-4ऑक्टोबर पासून पुन्हा
मध्यम ते दमदार पाऊस राहील..
याच काळात मोजक्या ठिकाणी पाऊस राहील..नंतर 6-7 पासून मुसळधार पाऊस राहील.
सर्व ठिकाणी नाही.. भाग बदलत आहे..
दिनांक 7-8-9 पासून बर्याच ठिकाणी पाऊस राहील विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..11 ऑक्टोबर पर्यंत..
पश्चिम महाराष्ट्रात..
सांगली पुर्व भागात, सोलापूर अहमदनगर नाशिक काही ठिकाणी पाऊस राहील.. सर्व ठिकाणी नाही.. भाग बदलत मोजक्या ठिकाणी दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. काळेभोर ढंग निर्माण होईल..
पाऊस मध्यम स्वरूपाचा फटकारे येतील..धुई धुक्यांचं वातावरण निर्माण होईल दिवसभर धुरकट वातावरण निर्माण होईल..
दिनांक 3-4 पासून भाग बदलत काही भागात पाऊस राहील पहिल्या दिवशी 65% भागात पाऊस होणार आहे..
पुढील काळात दिं.4-5-6 ऑक्टोबर जोरदार आगमन आहे.. मोजक्या भागात अतिवृष्टी पाऊस राहील..
खानदेश, पश्चिम विदर्भात..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव बुलढाणा
या जिल्ह्यात आजपासून 4-5 दिवस वातावरण मोकळे सुर्य प्रकाश पण दिवस मावळतीला ठिकठिकाणी ढग दाटून आल्यावर पाऊस होणार तुरळक ठिकाणी.. सर्व ठिकाणी नाही सर्वदूर पाऊस नाही..
शेतातील कामे बिनधास्त करा..
दिनांक.5-6 ऑक्टोबर पासून या भागात वातावरण पुन्हा सक्रिय होईल..
आपल्या भागांमध्ये वातावरण चांगले ही बिघडणार आहे पुढील अपडेट मध्ये उल्लेख केला जाईल..
पुढील अपडेट.
4-5 ऑक्टोबर बंगालच्या उपसागरात पुन्हा लो प्रेशर निर्माण होईल….
परतीचा प्रवास 15 ऑक्टोबर पासून माघार घेणार आहे..
तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव