गुड बाय मान्सून

तोडकर हवामान अंदाज अपडेट

🌧️येत्या 24 तासांतच मान्सून माघारी..

दिं.२२ ऑक्टोबर २०२४..

आजही भाग बदलत सक्रिय होईल..आजही गर्मी वाढ होऊन पावसाची शक्यता आहे खालील प्रमाणे विभागानुसार…

मराठवाड्यात..

जालना बीड परभणी धाराशिव हिंगोली नांदेड लातूर परभणी परळी वैजनाथ परिसरातील तालुक्यांना भाग बदलत तर काही भाग सोडत दुपारनंतर काही दिवस मावतीला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे..

धुरकट वातावरण आणि ढगाळ परिस्थिती दिसल्यानंतर तसेच गर्मी जास्त असलेल्या भागांमध्ये आभाळ मेघगजनेसह गडगडात करत असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे आजच्या दिवस सतर्क रहावे..

विदर्भात..

बुलढाणा अकोला वाशिम खामगाव मेहकर लोणार देवराजा शेवगाव चिखली याही परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी का होईना पावसाचा आगमन दुपारनंतर दिवस मावतीच्या वेळेला आहे तर काही ठिकाणी रात्री आहे..

आजच्या दिवस आपणही सतर्क रहावे आभार भरून आल्यास गडगडाट असल्यास दुपारी तीन चार वाजता सतर्क रहा वे.

 

पश्चिम महाराष्ट्र खानदेश

वातावरणातील मोठा बदल आजचा दिवस आपल्या भागात आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर पुणे सातारा सांगली पंढरपूर कोल्हापूर या भागांनाही आज भाग बदलत पाऊस आहे काही भागांना दुपारनंतर प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण होईल बऱ्याच ठिकाणी तो सोडेल पण मोजके ठिकाणांमध्ये गडगडाट सह वादळीवार्यासह पाऊस आहे..

 

दक्षिण महाराष्ट्रात...

लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर..आपणास वातावरण 23 24 ला विश्रांती घेईल..

25 26 27 काळामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे मोजक्या ठिकाणी असेल पण ढगाळ वातावरण सर्व दूर राहणार आहे..अति पावसामुळे पेरणी लांबली आहे.त्यामुळे पेरणीचा निर्णय 29 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान घ्यावा..आजही 22 ऑक्टोबर आपल्या भागांमध्ये मेघगर्जनेसह बदलत भाग सोडत पाऊस आहे..

आता थोडक्यामध्ये...

महाराष्ट्रातील मान्सून 23 ऑक्टोबरला दुपारनंतर माघार घेतोय कर्नाटक राज्यामध्ये माघार घेण्यासाठी 24 ऑक्टोबर ही तारीख निवडली आहे पण चक्री स्थितीमुळे एक मोठी लेयर पावसाची बनणार आहे पश्चिम कर्नाटक पूर्व कर्नाटक या भागांमध्ये गडगडाटासह पाऊस होणार आहे..

कर्नाटक बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे..कर्नाटक मधून मान्सून 25 26 ला माघार घेईल..

प्रिय शेतकरी बांधवांनो प्रतीचा मान्सून गेल्यानंतरही पाऊस बरसत असतो त्याचे अपडेट देखील याच वेबसाईट वरती आपणास देण्यात येईल काळजी नसावी..

तोडकर हवामान अंदाज यूट्यूब चैनल तसेच फेसबुक इंस्टाग्राम वरती आपणास अपडेट मिळत राहतील जय शिवराय…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top