एक दोन दिवस सुर्यदर्शन

THFS wheather update..4 August..

राज्यात पुन्हा सुर्यदर्शन 5ऑगस्ट, मात्र जोर ओसरेल 7 ऑगस्ट..

व तसेच दिं.5-6ऑगस्ट दरम्यान खालील प्रमाणे शक्यता राहील…

हवामान अंदाज जिल्ह्या विभागानुसार..
१.मराठवाड्यात पावसाचा अंदाज.
संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली.
वरील जिल्ह्यात वातावरण सक्रिय आहे..पण परिस्थिती वरील भागात दिशा नुसार दिवसा दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन आणि वारे राहिल…4 झडीचं वातावरण राहील पण आधुन मधुन तुरळक उन ही दिसेल..4ऑगस्ट संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत वातावरण बिघडणार आहे..या मध्ये लातूर बीड धाराशिव काही ठिकाणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार आगमन होईल काही ठिकाणी चांगला पावसाची शक्यता..
दिनांक..4-5ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह राहील.. मात्र भाग बदलत काही ठिकाणी..

पाच ऑगस्ट ऊन आणि दुपारनंतर पावसाचा खेळ साडेचार पाच वाजेपर्यंत काही ठिकाणी उघड तर दुपारनंतर काही ठिकाणी ढगाची गर्दी होऊन सटकारे.सुरू होतील..
२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा

दिनांक .4- ऑगस्ट सकाळी पहाटे झडी व काही ठिकाणी मध्यरात्री सक्रिय होईल.फवारणीसाठी योग्य वातावरण नाही.

५ ऑगस्ट सुर्यदर्शन ८०% भागात उघाड मिळेल फवारणी योग्य वातावरण राहील.. पावसाचा जोर नेहमी प्रमाणे राहील.६-७ थोडी उघाड मिळेल..व‌पुन्हा
बर्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस  दिं.१४-१५ ऑगस्ट राहील..


..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
या भागात आजही वातावरण झडी सारखाच आहे..
काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार..
दिनांक 4- झडी सारखाच पण बरा आहे..
दिनांक..6-7ऑगस्ट स्थानिक वातावरण जरा मोकळे सुर्य दर्शन होईल .. …व या जिल्ह्यामध्ये चांगले सुर्यदर्शन 9-10 पासून होणार आहे.. तोपर्यंत मात्र ढगाळ वातावरण गर्मीची लेवल वाढल्यामुळे शितोडे.

४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा ऑगस्ट महिन्यात या भागात कोल्हापुरात बर्याच ठिकाणी पाऊस झाला..आज 4 पुन्हा सर्वात जास्त वातावरण चांगले वरील सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय होईल..
सांगली सोलापूर सातारा वातावरण बिघडणार आहे…
वरील सर्व ठिकाणी पाऊस राहील.. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्री पर्यंत पाऊस राहील..वदिशा बदलून पाऊस पडेल.पण दिनांक 4 -5पर्यंत सर्व ठिकाणी कमी आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील.
दिनांक..6-7 ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भागात बदलत  राहील.. मात्र मोजक्या ठिकाणी.. काही ठिकाणी उघाड ही मिळणार आहे.

५.खानदेशात पावसाचा अंदाज..

धुळे नंदुरबार शहादा जळगाव

सुर्य दर्शन काही ठिकाणी ५ ऑगस्ट रोजी..पण यात काही ठिकाणी पाऊस राहील..

वरील जिल्ह्यात काही ठिकाणी मागिल आठवड्यापासून चांगला पाऊस आहे.. आज दिं.4 ऑगस्ट जळगावात उत्तर काही भागात जोर वाढेल.. धुळे मालेगाव साईट चांगली राहील…
दिनांक..6-7 ऑगस्ट वातावरण कमी होईल…. मात्र मोजक्या ठिकाणी‌ स्थानिक वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी पाऊस.. शेतातील कामे करण्यासाठी सहा आणि सात ऑगस्ट पोषक राहील फवारणी व खुरपणी यासाठी योग्य दिवस आहे मोजक्या ठिकाणी मात्र स्थानिक वातावरण तयार होऊन हलके सरी अस शकतात किंवा जोरदार सटकार येऊ शकतो.
६. कोकण किनारपट्टी..
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश...

नेहमी प्रमाणे पण जोर आज वाढेल..
आभाळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण.. मध्यम ते जोरदार पाऊस सर्वत्र राहील.. पुढील पाच दिवस चांगला पाऊस व ढगाळ राहील….

पुढील अपडेट…. ८-९ ऑगस्ट दरम्यान राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल..

याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..

किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…

तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव

1 thought on “एक दोन दिवस सुर्यदर्शन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top