तोडकर हवामान अंदाज लाईव्ह अपडेट..
5 September rainfall update live..
आज स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस राहील..
पुर्व विदर्भात.
नागपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा अमरावती
या जिल्ह्यात काही ठिकाणी आभाळ दुपारनंतर भरून येईल.
व काही ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील..
सकाळपासून धुई धुकं व दुपारनंतर गर्मीची लेवल वाढणार आणि स्थानिक वातावरणामुळे बऱ्याच भागांना मेघगर्जनेसह पाऊस होणार.. पाऊस सर्व दूर जरी नसला वातावरण सगळीकडे ढगाळ काळ्या कुट्ट ढगाचं पाहायला मिळणार.
आणि दुपारनंतर कोणत्याही क्षणी संध्याकाळपर्यंत पाऊस होणार..
मराठवाड्यात..
जालना बीड संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली
या जिल्ह्यात जोरदार आगमन पण भाग बदलत मोजक्या ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी दिवस मावळतीला काळेभोर ढगाळ वातावरण निर्माण होईल..
वरील जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये दुपारनंतर ढग निघू लागतील पाऊस आणि फटकारे या दोन्ही वातावरण सक्रिय होईल..
सहसा ही गोष्ट दिवस मावतीलाच होईल..
मध्यम ते दमदार पाऊस राहील..
याच काळात मोजक्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील.
सर्व ठिकाणी नाही.. भाग बदलत आहे..
पश्चिम महाराष्ट्रात..
सांगली पुर्व भागात, सोलापूर अहमदनगर नाशिक काही ठिकाणी पाऊस राहील.. सर्व ठिकाणी नाही.. भाग बदलत मोजक्या ठिकाणी दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. काळेभोर ढंग निर्माण होईल.. विशेष सोलापूर धाराशिव लोहारा खुर्द या परिसराकडे या वातावरणाचा जोर जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.. पावसाचे स्वरूप जोरदार
पाऊस मध्यम स्वरूपाचा फटकारे येतील..
खानदेश, पश्चिम विदर्भात..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव बुलढाणा
या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण दुपारपर्यंत मोकळे सुर्य प्रकाश पण दिवस मावळतीला ठिकठिकाणी ढग दाटून आल्यावर पाऊस होणार आहे.. सर्व ठिकाणी नाही सर्वदूर पाऊस नाही..
पण मोजक्याच ठिकाणी पाऊस चांगला बरसणार आहे..
दिवस मावळतीला आभाळ भरून आलेलं दिसल्यावर कामे आटोपून घ्या..
पुढील अपडेट..
6 सप्टेंबर रोजी वरील प्रमाणे सेम कंडीशन..
श्री गणेश उत्सवामध्ये पावसाचे आगमन उत्तर महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण निर्माण होईल पाऊस राहील..
मात्र दक्षिण महाराष्ट्रात किरकोळ सरी व विश्रांती 7ते12 सप्टेंबर पर्यंत राहील..
तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव
याच काळात लोणार सरोवर तालुक्यातील वातावरण कसे राहील , आणि अशीच तालुकानिहाय माहिती जल दिली,तर समजायला सोपे होते.
तालुकानिहाय माहिती द्यावी साहेब
धन्यवाद सर 🙏🙏