आज पासून जोरदार

तोडकर हवामान अंदाज लाईव्ह अपडेट..

20 September rainfall update live..

आज स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस राहील..

आज पासून ढंग व धुरकट वातावरण निर्माण होईल

अवकाळी वारे विजांचा प्रचंड गडगडाट विजांचा धोका ही माहिती तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर दररोज रात्री ८.०० वाजता लाईव्ह मध्ये उल्लेख केला जातो..

आता हवामान अंदाज खालील प्रमाणे..

पुर्व विदर्भात.

नागपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा अमरावती

या जिल्ह्यात काही ठिकाणी आभाळ दुपारनंतर भरून येईल.

व काही ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील.. विजांचा प्रचंड गडगडाट पाऊस राहील.

पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस राहील.

 

मराठवाड्यात..

जालना बीड संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली

या जिल्ह्यात जोरदार आगमन पण आज भाग बदलत मोजक्या ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी दिवस मावळतीला काळेभोर ढगाळ वातावरण निर्माण होईल..

मध्यम ते दमदार पाऊस राहील..

याच काळात मोजक्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील.

सर्व ठिकाणी नाही.. भाग बदलत आहे..

दिनांक 21 पासून बर्याच ठिकाणी पाऊस राहील विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..6 ऑक्टोबर पर्यंत..

पश्चिम महाराष्ट्रात..

सांगली पुर्व भागात, सोलापूर अहमदनगर नाशिक काही ठिकाणी पाऊस राहील.. सर्व ठिकाणी नाही.. भाग बदलत मोजक्या ठिकाणी दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. काळेभोर ढंग निर्माण होईल..

पाऊस मध्यम स्वरूपाचा फटकारे येतील..धुई धुक्यांचं वातावरण निर्माण होईल दिवसभर धुरकट वातावरण निर्माण होईल..

दिनांक 21 पासून मुसळधार पाऊस राहील पहिल्या दिवशी 65% भागात पाऊस होणार आहे..

पुढील काळात दिं.२३-२४-२५ महापुर आहे.. अतिवृष्टी पाऊस राहील..

खानदेश, पश्चिम विदर्भात..

धुळे नंदुरबार शहादा जळगाव बुलढाणा

या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण दुपारपर्यंत मोकळे सुर्य प्रकाश पण दिवस मावळतीला ठिकठिकाणी ढग दाटून आल्यावर पाऊस होणार आहे.. सर्व ठिकाणी नाही सर्वदूर पाऊस नाही..

पण मोजक्याच ठिकाणी पाऊस चांगला बरसणार आहे..

दिवस मावळतीला आभाळ भरून आलेलं दिसल्यावर कामे आटोपून घ्या..

दिनांक 21 पासून आपल्या भागात भाग बदलत पाऊस राहील.. दिनांक २३-२४-२५ मुसळधार पाऊस राहील विजांचा लखलखाट आहे खुप मुसळधार पाऊस राहील..६ ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहील..

पुढील अपडेट्स 

१ ऑक्टोबर रोजी वरील प्रमाणे सेम कंडीशन.. पुन्हा राहील..

बंगालच्या उपसागरात पुन्हा लो प्रेशर निर्माण होईल….

तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top